Thursday, January 8, 2009

मैत्री

तुमची आमुची मैत्री 

फ़ुलपाखरा सारखी असे

उडता उडता आकशी ते

फूला पानावर बसे 


मैत्रीचा अर्थ सांगताना 

मोगरा मज आठवतो 

वादळे सात आली जरी

तरी टवटवीत बहरतो


मैत्री म्हणजे एक दिवा

तेवत राहातो अखण्ड

विश्वासाचे तेल घालुनी

ज्योत बळावते प्रचंड 


मैत्री म्हणजे असतो धडा

राग लोभ आणि मदतीचा

कधी येते कठीण परिक्षा

गुण मिळवावा सोबतीचा



आयुष्याच्या अमर्याद प्रवासाचा 

क्षीण कधी जाणवतो

मैत्री सारखे औषध नाही

खचितच उत्साह दुणावतो


समजुन घे त्या मित्राला

त्याच्या अंतर-भावनांना

कधी कृती तुला न भावे

अर्थ तरी उमगतो ना?

1 comment: