Thursday, January 8, 2009

मैत्री

तुमची आमुची मैत्री 

फ़ुलपाखरा सारखी असे

उडता उडता आकशी ते

फूला पानावर बसे 


मैत्रीचा अर्थ सांगताना 

मोगरा मज आठवतो 

वादळे सात आली जरी

तरी टवटवीत बहरतो


मैत्री म्हणजे एक दिवा

तेवत राहातो अखण्ड

विश्वासाचे तेल घालुनी

ज्योत बळावते प्रचंड 


मैत्री म्हणजे असतो धडा

राग लोभ आणि मदतीचा

कधी येते कठीण परिक्षा

गुण मिळवावा सोबतीचा



आयुष्याच्या अमर्याद प्रवासाचा 

क्षीण कधी जाणवतो

मैत्री सारखे औषध नाही

खचितच उत्साह दुणावतो


समजुन घे त्या मित्राला

त्याच्या अंतर-भावनांना

कधी कृती तुला न भावे

अर्थ तरी उमगतो ना?

विचार

मला तुझी आठवण येत होती

बोलुन जरा हलकं होईल असं वाटंत होतं..

पण काही सांगण्यासारखं उरलंच नव्हतं

मनात नवीन चैतन्य राहिलंच नव्हतं


माझा दिवस चांगला असतो तेव्हां

रात्रीची वाट बघण सोपं असतं

कारण तेव्हां काळ्या आकाशात 

तुझा चंद्रासारखा प्रकाश असतो


मला आज लिहिण्याची मुळीच इच्छा नाही

तुझ्या शिवाय जगण्याची शक्यताच नाही

मला वाटतं तुला कळंत असेलंच

तुला नवीन सांगण्याची गरजंच नाही


तुला सांगतांना मला थोडी भिती वाटते

मला सारखी सारखी तुझीच आठवण येते

कसा सांगू तुला माझ्या मनात आहे काय?

तुझी साथ सुटणं मला सोसवेल काय?

पहिलं वहिलं लिखाण !

हे विधी देवता 
तूच आमुचा सखा
विश्वाच्या ह्या पसाऱ्यातही
तुच पाठीराखा
तूच आमुचा सखा

सुर्य गोलही तळपू लागले
उजळल्या दाही दिशा
सरस्वतीने सर्व अर्पिले
परमेश्वर सोयरा

पृथ्वीला वरदान मिळाले
मनुष्य प्राण्या जीवन दिधले
नियतीने हा खेळ साधला
आकाशातुन पाऊस पडला 


Introduction

Sometimes I think. Sometimes I write. 

Now I think, it's about the time when I should make you write about what I write. 

Let's not make it complicated.

Go ahead. Read and write.