Tuesday, March 10, 2009

कोणासाठी? तुझ्यासाठी

कोणासाठी? तुझ्यासाठी...


पानच्या पानं लिहीत गेलो

शाईची बाटली संपवत गेलो

विजेचे बिल भरत गेलो

कोणासाठी? तुझ्यासाठी...


सायकल हाणीत मंडईत गेलो

दोन किलो कांदे आणले

जरी पाऊस पडत होता

तरी कांद्याचे पोहे मांडले

कोणासाठी? तुझ्यासाठी...


खिषात नव्हते पैसे कधीच

तरी घेतली साडी जरीची

वाढदिवसालाही उपास केला

आहे का तुला ह्याची प्रचिती?

कोणासाठी? तुझ्यासाठी...


आज लिहीतो आहे शेवटची कविता

शब्द लिहीणं थांबवतो

विषाची बाटली उघडुन ठेवली

एक घोट घेऊन बघतो

कोणासाठी? 

साथ

वेळी अवेळीच्या वादळांमध्ये

मी सुर्यप्रकाश पाहीन ना?

पावसा पाण्याला तोंड देताना

तुझी साथ राहील ना?


कुठलही संकट आलं तरी

माझी शक्ती राहील ना?

त्याच्या समोर उभं राहायला 

माझी हिम्मत बांधेल ना?

तुझी साथ राहील ना?


कधी तरी चट्कन वाटतं

देव कधी तरी पाहील ना?

माझ्या सगळ्या प्रयत्नांना

यश तो वाहील ना?

तुझी साथ राहील ना?


जेव्हा जेव्हा आठवण आली

तेव्हा मला सांगशील ना?

उद्या पुन्हा ऊन आलं

तरी जवळ राहाशील ना?